Type Here to Get Search Results !

प्रा. अभिजीत आदिनाथ गळतगे यांना डॉक्टरेट पदवी जाहिर.

 


प्रा. अभिजीत गळतगे यांना पीएच.डी. पदवी

MIT Art, Design & Technology University येथील अभियांत्रिकी व विज्ञान विद्यालयातील प्रा. अभिजीत गळतगे यांनी “Prediction of Earthquake Response for RC Infilled Frame using Artificial Intelligence” या विषयावर यशस्वीरित्या पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

या संशोधनामध्ये भूकंपाच्या वेळी आर.सी.सी. इन्फिल्ड फ्रेम संरचनांचे वर्तन कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूक भाकीत करण्याचा अभ्यास करण्यात आला. प्रयोगात्मक चाचण्या, संख्यात्मक विश्लेषण आणि मशीन लर्निंग मॉडेल्स यांच्या आधारे संरचनांच्या ऊर्जा शोषण क्षमता व डक्टिलिटीचा सखोल अभ्यास करण्यात आला.

या कार्यामुळे भूकंपप्रवण भागातील इमारतींच्या सुरक्षित रचना डिझाइनसाठी उपयुक्त मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यापीठातील मान्यवर, सहकारी तसेच मित्रपरिवार व कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments