अकिवाट ते मजरेवाडी रस्ता मागील तीन वर्षापासून डांबरीकरणाचे काम करण्यात आले नाही व पॅचवर्कचे काम सुद्धा करण्यात आलेले नाही. या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोठ- मोठे खड्डे पडले असून त्यातूनच मार्ग काढावा लागत आहे.
अनेक शेतकऱ्यांची पाईपलाईन रस्त्यातून गेली असल्याने रस्ता खाली खचत आहे. या मार्गावरून प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
ऑक्टोंबर महिन्यापासून ऊस कारखाने चालू होत असल्याने शिरोळ तालुक्यातून येणारे ऊसाचे ट्रक , ट्रॉली या अवजड वाहनामुळे पुन्हा रस्ते अधिक खराब होण्याची शक्यता आहे .
कारखाने सुरू होण्याच्या आधी रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार अकिवाट व मजरेवाडी गावच्या नागरिकांनी घेतला आहे.

Post a Comment
0 Comments